शतकोटी भारतीयांमध्ये दोनच महात्मा झाले एक फुले व दुसरे गांधी त्यापैकी पहिला महात्मा असणार्‍या महात्मा फुले यांना 'भारतरत्न' मिळावा यासाठी ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही ज्यांना आपल्या सामाजीक कार्यासाठी गुरू मानले त्या फुल्यांना व भारतातील स्त्री शिक्षणाचा आधारस्तंभ असणार्‍या सावित्रीबाई फुले यांना 'भारतरत्न' पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तरी कृपया 'आपला अभिप्राय' मध्ये या बाबतचा आपला अभिप्राय नोंदवावा, हि नम्र विनंती.

मुख्य पानावर