साल घटना
११ एप्रिल १८२७ जन्म
१८३४ ते १८३८ पंतोजींच्या शाळेमध्ये शिक्षण
१८४० नायगावच्या श्री खंडोजी नेवसे यांची कन्या 'सावित्री' हिच्याशी विवाह
१८४१ ते १८४७ मिशनरीच्या शाळेमधून प्राथमिकशिक्षण
१८४७ थॉमस पेन च्या 'राइटस ऑफ मॅन' या पुस्तकाचे वाचन व त्याचा प्रभाव
१८४८ क्षुद्र व अतिक्षुद्र मुलींसाठी शाळा सुरु केली.
१८४९ क्षुद्रांना सुशिक्षित करण्याची शपथ घेऊन पत्निसह घर सोडले
१८५१ पुण्यातील चिपळूणकर वाड्यात मुलींची शाळा सुरू केली.
१६ नोव्हेंबर १८५२ शिक्षण क्षेत्रातील अनमोल कार्याबद्दल सरकारी शिक्षण खात्याकडून मेजर कॅंडी यांच्याकडून सत्कार
१८५४ स्कॉटीश स्कूल मध्ये पार्टटाईम शिक्षक म्हणून नोकरी
१८५५ रात्रशाळा सुरू केली
१८५८ शाळेच्या व्यवस्थापन समितीमधून निवृत्ती
१८६० बालविधवा पुनर्विवाह चळवळ
१८६३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना
१८६८ वडिलांचा मृत्यू
१८६८ अस्पृशांसाठी स्वत:च्या घरातील हौद खुला केला
१ जुन १८६९ छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा
१ जुन १८७३ गुलामगिरी
२४ सप्टेंबर १८७३ सत्यशोधक समाजाची स्थापना
१८७५ दयानंद सरस्वती यांची मिरवणूक
२० मार्च १८७७ सत्यशोधक समाज- पुणे शाखेचा अहवाल प्रसिध्द
१८७६ ते १८८२ पुणे महानगरपालिकेचे सदस्यत्व
१९ ऑक्टोंबर १८८२ हंटर शिक्षण आयोगापुढे निवेदन सादर
१८ जुलै १८८३ ' शेतकर्‍यांचा आसूड ' या प्रसिध्द पुस्तकाचे लेखन
१ ऑक्टोंबर १८८५ ' ईशारा ' या पुस्तकाचे लेखन
२ मार्च १८८८ ड्युक ऑफ कॅनॉटचा सत्कार व फुलेक्रुत दंभ्यस्फोट
११ मे १८८८ जनतेकडून सत्कार व 'महात्मा ' ही पदवी अर्पण
१ एप्रिल १८८९ सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकाचे लेखन
२८ नोव्हेंबर १८९० महानिर्वाण

मुख्य पानावर