प्रत्येक गावा्बाहेर एक छोटा महारवाडा आहे,
चवथीच्या पुस्तकात मात्र समानतेचा धडा आहे ...

        श्री चंद्र शेखर गोखले यांचे हे शब्द 'सध्याच्या' समानतेवर योग्य प्रहार करतात. २१ वे शतक म्हणत आपण भविष्याकडे झेप घेत असताना प्रत्यक्षात आपण खरोखरच 'समान' झालो आहोत का ? हे पाहण्याची गरज आहे ! जात, धर्म, पंथ,राष्ट्र , वंश आदी वादांमध्ये अडकून पडलो आहोत .'जिथे वाद आहे, तिथे विषमता तर जिथे संवाद तेथेच समता असेल ' असे मला वाटते.

        स्त्री-शिक्षण , विधवाविवाह, बालहत्या प्रतिबंधगृह, सत्यशोधकसमाज, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, व दारुबंदी इ. त्यांनी केलेले कार्य अनमोलच असले तरी मला त्यांचे आवडलेले सर्वात महत्वाचे कार्य मात्र 'समानसाठीचे प्रयत्न '.

        अर्थात, हे संकेतस्थल मराठी भाषेमध्ये निर्माण करून आंतरराष्ट्रीय स्तरावर संदर्भासाठी सोयीस्कर असावी अशा पध्दत्तीने निर्माण केली आहे. त्यामुळे महात्मा फुलेंविषयी शक्य तितकी उपलब्ध माहिती यात समाविष्ट केली आहे.

ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे !
माझिया रक्‍तात थोडा ईश्वराचा अंश आहे !!

        ग. दि. मा. यांच्या रचनेशी साधर्म्य असणारी व्यक्‍ती, त्या परमात्म्याचा अंश असलेल्या त्या महात्म्याचे संकेतस्थल विश्वाला सादर समर्पित.

मुख्य पानावर