तृतीयरत्न नाटक

        १८५५ साली त्यांनी (म. फुल्यांनी) 'तृतीयरत्न रत्न' नावाचे नाटक लिहीले, त्यांत ब्राम्हणांनी देवाच्या नावाने जे समज पसरविले होते आणि अंधश्रध्दा निर्माण केल्या होत्या, त्या सर्व उजेडात आणल्या. त्या नाटकाची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की , एक ब्राम्हण भिक्षूक एका खेड्यात फिरत असता एका शेतकर्‍याच्या गरोदर पत्नीला पाहतो. तो तिला सांगतो की, तुझ्या भावी मुलाचा जन्म तुझ्या नवर्‍याला घातक ठरणार आहे्‌. हे भविष्यकथन ऐकून ती भेदरून जाते. तो ब्राम्हण भिक्षूक तिला सांगतो की, हे संकट दूर व्हावे म्हणून तुझ्या कुटूबांच्या वतीने मी देवाची प्रार्थना करतो. असे म्हणून तो तिचे सांत्वन करतो, त्याची सूचना ती मान्य करते. शेतकर्‍याच्या घरी ही प्रार्थना आणि ब्राम्हणभोजन चालले असता एक ख्रिस्ती धर्मोपदेशक तेथे योगायोगाने येतो. वादविवादास प्रारंभ होतो. ब्राम्हणाची लबाडी उघडकीस येते.

        जोतिरावांनी शेवटी त्या चर्चेपासून असा निष्कर्ष काढला की, मूर्तिपूजेपेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ होय. जोतीरावांनी शेवटी तो शेतकरी आणि त्याची पत्नी यांना आपण खास काढलेल्या प्रौढांच्या रात्रशाळेत शिकावयास जाण्याचा उपदेश केला आहे .


(धनंजय कीर, महात्मा जोतीराव फुले, मुंबई, १९६८, प्रु. ८४)

 

मुख्य पानावर | साहित्य